Amla For Hair Care | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ पद्धतीने वापरा आवळा

Amla For Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे केसांची काळजी घेण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी आवळा उपयुक्त ठरू शकतो. आवळ्याच्या मदतीने कोरडे केस, केसातील कोंडा, केस गळती इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने आवळ्याचा वापर करू शकतात.

गुलाब जल आणि आवळा (Rose water & Amla For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी गुलाब जल आणि आवळा पावडर उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळा पावडरमध्ये चार ते पाच थेंब गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास केसांवर लावून ठेवावी लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.

आवळा पेस्ट (Amla paste For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याची पेस्ट वापरू शकतात. यासाठी तुम्हाला एक ते दोन आवळे घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटे केसांना लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एक वेळा या पेस्टचा वापर केल्याने तुमचे केस निरोगी राहू शकतात.

कोरफड आणि आवळा (Aloevera & Amla For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्यासोबत कोरफडीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला तीन चमचे आवळा पावडरमध्ये पाच चमचे कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून एक वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केस चमकदार मऊ आणि दाट होऊ शकतात.

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर हायड्रेट राहते (The body stays hydrated-Amla Juice Benefits)

उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे बहुतांश लोकांना डीहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी आवळ्याचा रस तुमची मदत करू शकतो. आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहू शकते. त्याचबरोबर या रसाचे नियमित सेवन केल्याने थकवा दूर होतो.

रोगप्रतिकाशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Amla Juice Benefits)

उन्हाळ्यामध्ये सतत आजारी पडणाऱ्यांसाठी नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही उष्माघातापासून दूर राहू शकतात. नियमित आवळ्याचा रस प्यायल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या