Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह जाणार? जयंत पाटील म्हणाले…

Jayant Patil | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तर सत्ताधारी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचं म्हटलं जातंय. तसचं राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. याचं पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये आम्ही आमची कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवु. तसंच त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत असं देखील म्हटलं. तर गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतू आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे त्यामुळे त्याबाबत मी टीका टिपणी करणं योग्य नाही.  देशातील कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात याविषयीच्या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात. आगामी  निवडणुकांमध्ये आमची कामगिरी चांगली झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पुढे जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे तर त्याला धक्का लागणार नाही. ते चिन्ह कायम राहणार आणि महाराष्ट्राचा विचार केला तर या चिन्हाला कोणताही धक्का लागणार नाही. त्यामुळे विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.” असं जयंत पाटलांनी सांगितलं. याचप्रमाणे देशातील इतर पक्षाच्या बाबतीत देखील निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जुना असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे. आता निवडणूक आयोगाकडून निर्णय झाला आहे यामुळे आमची केंद्रीय पक्ष समिती योग्य तो विचार करत आहे. पण सध्या प्रादेशिक पक्ष म्हणून आमचा पक्ष काम करताना पाहायला मिळेल. असं मत देखील जयंत पाटलांनी व्यक्त केलं.

पण आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल का? पुढे काय असेल शरद पवारांची खेळी? राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेल्या धक्क्यामुळे पवार भाजपशी युती करणार का? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-