Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. विदर्भ आणि कोकणामध्ये पुढील काही दिवस पाऊस नसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), मुंबईसह कोकणातील चार जिल्हे आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उद्यापासून पुढचे तीन दिवस अवकाळी वातावरणापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 ते 3 दिवस म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरण जाणवण्याची शक्यता आहे.

‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस (Unseasonal rain will fall at ‘this’ place)

कोकण आणि विदर्भ वगळता राज्यात इतर ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुढील पाच दिवस विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button