Ghulam Nabi Azad । राहुल गांधींनी केलेल्या ‘या’ ट्वीटला गुलाम नबी आझादांचं प्रत्युत्तर

Ghulam Nabi Azad | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून काँगेस नेते राहुल गांधी हे अदानी प्रकरणावरुन भाजपला लक्ष्य करून टीका करत असल्याने चर्चेत आहेत. तर शरद पवार यांनी या प्रकरणात आपलं मत मांडत राहुल गांधींचे कान टोचले होते. तरीही राहुल गांधी काय हा विषय सोडायला तयार नाहीत. शनिवारी राहुल गांधी यांनी एक पझल कार्ड ट्वीट करत भाजपावर टीका करत पुन्हा हल्लाबोल केला. त्या ट्वीटमधून त्यांनी गुलाब नबी आझाद यांच्यासह काँग्रेस सोडून गेलेल्या पाच नेत्यांनाही लक्ष्य केलं होतं. तर त्यांच्या ट्वीटला आता गुलाम नबी आझाद यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांचे विदेशात ‘नको’ त्या उद्योगपतींशी संबंध असल्याचं एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे.

या संदर्भात बोलताना गुलाब नबी आझाद म्हणाले की, राहुल गांधी आणि गांधी परिवाराचे विदेशातील नको त्या उद्योपतींशी संबंध आहेत. याबाबत मी १० उदाहरणे देऊ शकतो. तसचं तर विदेशात कोणाला भेटायला जातात, हे आम्हाला माहिती आहे, अशी जोरदार प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला, असं अनेक लोकांना वाटतं आहे परंतु, मला याबाबद्दल असं काहीच वाटत नाही कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले तेव्हा त्यांच्याबरोबर एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता. काँग्रेसमधील तरुणवर्ग त्याच्यावर नाराज आहे आणि अनिल ॲंटोनी यांच्या सारखे तरुण नेते देखील जातं असल्याचं सर्वांना पहायला मिळत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

तर राहुल गांधी यांनी जे एक पझल कार्ड ट्वीट केलं होत यामध्ये गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस सोडून गेलेल्या पाच नेत्यांची नावं दर्शवत त्या नावांमध्ये अदानी हवं नाव कसं लपलं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. लोक सत्य लपवतात म्हणूनच रोज लोकांची दिशाभूल करतात. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुणाचे आहेत, असा प्रश्नही त्यांनी विचारला पझलद्वारे विचारत निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.