🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमधील अंतर्गत वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरात आज एक धक्कादायक प्रकार घडला असून, तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या एका महिला कार्यकर्तीने चक्क माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांना भररस्त्यात अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
नेमका प्रकार काय?
भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर डॉ. भागवत कराड यांची गाडी आली असता, या नाराज महिलेने थेट गाडीसमोर धाव घेतली. संतापाच्या भरात या महिलेने कराड यांच्या गाडीच्या काचेवर जोरजोरात हाताने मारण्यास सुरुवात केली. केवळ निषेधच नोंदवला नाही, तर रागाच्या भरात महिलेचा तोल सुटला आणि त्यांनी कराड यांना उद्देशून अत्यंत अर्वाच्य शब्दांचा वापर केला.
Woman Abuses BJP Leader Bhagwat Karad
“तू हरामी, हरामखोर आहेस…” व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती महिला कराड यांच्याकडे बोट दाखवून, “तू हरामी आहेस, तू हरामखोर आहेस, तुला माझा शाप लागेल,” असे ओरडताना स्पष्ट दिसत आहे. आपल्या हक्काचे मनपाचे तिकीट कापले गेल्याच्या रागातून या महिलेने थेट नेत्यालाच लक्ष्य करत शिवराळ भाषा वापरली. यावेळी गाडीत बसलेले कराड काहीसे गडबडलेले दिसले, तर आजूबाजूच्या कार्यकर्त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. महिलेचा आक्रमक पवित्रा पाहून भाजप कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी धाव घेत तिला गाडीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला मागे हटायला तयार नव्हती. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर तिला बाजूला करण्यात आले आणि कराड यांच्या गाडीला वाट मोकळी करून देण्यात आली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, तिकीट वाटपावरून पक्षात असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
महिलेचा आक्रमक पवित्रा आणि अर्वाच्य भाषा पाहून उपस्थित भाजप कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले. अखेर सुरक्षारक्षक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत महिलेला गाडीपासून दूर केले. राजकीय वर्तुळात चर्चा तिकीट नाकारल्यामुळे एका महिलेने अशा प्रकारे जाहीरपणे ज्येष्ठ नेत्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पक्षातली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून, यावर आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
प्राथमिक माहितीनुसार, राडा करणारी ही महिला भाजपचीच कार्यकर्ती असून आगामी मनपा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. मात्र, पक्षाकडून उमेदवारी किंवा अपेक्षित पद न मिळाल्याने (तिकीट कापल्याने) त्या प्रचंड नाराज होत्या. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी थेट नेत्यालाच लक्ष्य केलं. “मी इतकी वर्ष काम केलं, आणि तुम्ही माझं तिकीट कापलं?” असाच जाब त्या विचारत होत्या.
📌 महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












