Share

Coconut Oil | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ पद्धतीने वापरा खोबरेल तेल

🕒 1 min read Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामुळे केसांची काळजी (Hair Care) अधिक घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांच्या या समस्यांवर मात करण्यासाठी खोबरेल तेल … Read more

Published On: 

🕒 1 min read

Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामुळे केसांची काळजी (Hair Care) अधिक घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांच्या या समस्यांवर मात करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. खोबरेल तेलाच्या मदतीने केसातील कोंडा, केस गळती इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने खोबरेल तेलाचा वापर करू शकतात.

कढीपत्ता आणि खोबरेल तेल (Curry leaves & Coconut Oil For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलासोबत कढीपत्त्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला कढईमध्ये आवश्यकतेनुसार खोबरेल तेल घ्यावे लागेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा कढीपत्ते मिसळून तेल गरम करून घ्यावे लागेल. तेल व्यवस्थित उकळल्यानंतर तुम्हाला ते टाळूला आणि केसांना लावावे लागेल. साधारण एक तास तुम्हाला हे तेल केसांवर ठेवावे लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील.

इतर तेल आणि खोबरेल तेल (Other oils and coconut oil & Coconut Oil For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदाम तेल मिसळून ते केसांना लावू शकतात. खोबरेल तेलामध्ये हे तेल मिसळून लावल्याने केस गळतीची समस्या दूर होते. त्यामुळे तुम्ही जर केस गळतीच्या समस्यावर मात करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर खोबरेल तेलासोबत इतर तेलांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

कापूर आणि खोबरेल तेल (Camphor & Coconut Oil For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल कोमट करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक ते दोन कापुराच्या गोळ्या मिसळून घ्याव्या लागतील. हे मिश्रण तुम्हाला केस धुण्याचा साधारण चार ते पाच तास आधी केसांना लावावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने केस निरोगी राहू शकतात.

खोबरेल तेल आणि मेथीचे दाणे (Fenugreek seeds & Coconut Oil For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये मेथी दाणे मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकून तेल कोमट करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल गाळून घ्यावे लागेल. या तेलाने केसांना नियमित मसाज केल्याने केस निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर या तेलाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला मिळते.

खोबरेल तेल आणि कांद्याचा रस (Onion juice & Coconut Oil For Hair Care)

केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेल आणि कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कांद्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित उकळून घ्यावे लागेल. हे तेल कोमट झाल्यानंतर तुम्हाला ते केसांना लावावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केस काळे राहतात आणि केसांची वाढही जलद होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही