Share

MAHA SBTC | महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद, मुंबई यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

MAHA SBTC | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद (Maharashtra State Blood Transfusion Council), मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

MAHA SBTC | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद (Maharashtra State Blood Transfusion Council), मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन (ईमेल द्वारे) आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद (MAHA SBTC) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये रक्त संक्रमण अधिकारी- 04 पदे, रक्तपेढी तंत्रज्ञ – 05 पदे, नोंदणीकृत परिचारीका – 02 पदे, लेखा अधिकारी – 01 पदे भरण्यात येणार आहे.

या भरती (MAHA SBTC) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती (MAHA SBTC) प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर आणि ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

SBTC कार्यालय, रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशॉ वाचा रोड, 194, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई- 400020.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

[email protected]

जाहिरात पाहा (View Ad)

https://mahasbtc.org/wp-content/uploads/2023/04/Fast-BW-scan-to-a-PDF-file_1_20230407150729453.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://mahasbtc.org/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही