Spinach For Hair | केसांची काळजी घेण्यासाठी पालकाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Spinach For Hair | टीम महाराष्ट्र देशा: पालक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पालकामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये आयरन, प्रोटीन विटामिन ए आणि विटामिन सी यासारखे पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे पालक आरोग्यसोबतच केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. पालकाच्या मदतीने केस गळणे, केसातील कोंडा इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने पालकाचा वापर करू शकतात.

पालकाची पेस्ट (Spinach paste For Hair)

केसांची काळजी घेण्यासाठी पालकाची पेस्ट उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला पालक पाण्यामध्ये उकळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तो पालक बारीक करून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसांच्या वाढीस चालला मिळू शकते.

मध आणि पालक (Honey and Spinach For Hair)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पालक आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला पालकाच्या पेस्टमध्ये मध आणि खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पालकामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा एरंडेल तेल देखील मिसळू शकतात. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांवर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सल्फेट फ्री शाम्पूने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते.

खोबरेल तेल आणि पालक (Coconut Oil and Spinach For Hair)

पालक आणि खोबरेल तेल केसांची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पालकाची पेस्ट बनवून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आवश्यकतेनुसार खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण एक तास केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस स्वच्छ धुवावे लागतील. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केस, दाट लांब आणि चमकदार होऊ शकतात.

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने पालकाचा उपयोग करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही खालील औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात.

कडूलिंब (Neem -Ayurvedic Herbs for Skin Care)

कडूलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटीस्पेक्टिक, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास डागांवर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून एक ते दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.

जेष्ठमध (Jesthamadh -Ayurvedic Herbs for Skin Care)

आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी जेष्ठमध उपयुक्त ठरते. त्याचबरोबर त्वचेवरील अनेक समस्या दूर करण्यासाठी जेष्ठमध फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला ज्येष्ठमध पावडरची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास डागांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या