Celery Seeds Oil | हृदय निरोगी राहण्यापासून ते फंगल इन्फेक्शन दूर करेपर्यंत ‘हे’ आहेत ओव्याच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे

Celery Seeds Oil | टीम महाराष्ट्र देशा: ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर ओव्याचे तेल देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ओव्याच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहाइड्रेट, पोटॅशियम, विटामिन सी, आणि विटामिन ई आढळून येते. ओव्याच्या तेलामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर ओव्याच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Celery Seeds Oil Benefits)

ओव्याच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. ओव्याच्या तेलामध्ये अँटी-हायपरलिपिडेमिक घटक आढळून येतात, जे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. ओव्याच्या तेलाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ओव्याच्या तेलाचा समावेश करू शकतात.

फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण (Protection against fungal infections-Celery Seeds Oil Benefits)

ओव्याच्या तेलाच्या मदतीने फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळू शकते. यामध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल गुणधर्म फंगल नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी उपाय शोधत असाल, तर ओव्याचे तेल तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकते.

त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for skin-Celery Seeds Oil Benefits)

त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी ओव्याच्या तेल उपयुक्त ठरू शकते. या तेलामध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म त्वचेवरील पिंपल्स आणि डाग दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या तेलाच्या मदतीने त्वचेवर होणारा संसर्ग दूर होऊ शकतो.

ओव्याच्या तेलाचा वापर केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी तुम्ही खालील तेलांचा वापर करू शकतात.

ऑलिव्ह ऑइल (Olive oil-For Stretch Marks)

कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइलने स्ट्रेच मार्क्सवर साधारण पंधरा ते वीस मिनिटे मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करावी लागेल. दिवसातून दोन वेळा या तेलाने मसाज केल्यास स्ट्रेच मार्क दूर होऊ शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-For Stretch Marks)

कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेलाने त्याच्यावर मसाज करावी लागेल. नियमित स्ट्रेच मार्कवर खोबरेल तेल लावल्याने तुमचे स्ट्रेसमार्क हळू-हळू दूर व्हायला लागतील.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.