Weather Update | कुठे मुसळधार, तर कुठे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता; पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तर, कुठे अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place in the state)

राज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे.

पुणे शहरामध्ये रविवारी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पुण्यामध्ये काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली. तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलचं झोपडलं आहे. अशा परिस्थितीत कसं जगायचं? काय करायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या