IPL 2023 | राजस्थान रॉयलचे दिल्लीपुढे 200 धावांचे आव्हान!

( IPL 2023, RR vs DC) गुवाहाटी : सध्या आयपीएल ची सुरुवात झाली आहे. तर राजस्थान रॉयलच्या यशस्वी जायस्वालची दमदार सुरुवात केली. जोस बटलरची संयमी फलंदाजी आणि शिमरोन हेटमायरच्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयलने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी केली. दिल्लीला विजयासाठी 200 … Read more

Published On: 

( IPL 2023, RR vs DC) गुवाहाटी : सध्या आयपीएल ची सुरुवात झाली आहे. तर राजस्थान रॉयलच्या यशस्वी जायस्वालची दमदार सुरुवात केली. जोस बटलरची संयमी फलंदाजी आणि शिमरोन हेटमायरच्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयलने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी केली. दिल्लीला विजयासाठी 200 धावांचे आव्हान मिळाले आहे.

राजस्थानचा युवा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याने आज आक्रमक सुरुवात केली. जायस्वाल याने 31 चेंडूत 60 धावांची खेळी केली. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी राजस्थानला दमदार सलामी दिली. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल फटकेबाजी करत असताना जोस बटलर संयमी फलदाजी करत साथ देत होता. बटलर आणि यशस्वी यांनी 8.3 षटकात 98 धावांची भागिदारी केली. राजस्थानच्या मोठ्या धावसंख्येचा पाया या जोडीने रचला.

जायस्वाल चौकार षटकार मारत असताना बटलर दुसऱ्या टोकाला शांतपणे फलंदाजी करत होता. जोस बटलर याने अखेरच्या काही षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने शिमरोन हेटमायर याला साथीला घेत संघाची धावसंख्या वाढवली. जोस बटलर याने 51 चेंडूत 79 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 11 चौकार आणि एक षटकार लगावला.

राजस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच हल्लाबोल केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजांचा त्यांनी समाचार घेतला. पहिल्या षटकापासूनच चौकारांचा पाऊस पाडला. सुरुवातीला यशस्वी जायस्वाल याने फटकेबाजी केली. त्यानंतर मधल्या षटकात जोस बटलर याने आपले काम चोख बजावले आणि अखेरच्या षटकात हेटमायरने फिनिशिंग टच दिला.

महत्वाच्या बातम्या –

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही