Droupadi Murmu | अभिमानास्पद! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ‘सुखोई 30’ या लढाऊ विमानातून उड्डाण

President Droupadi Murmu | नवी दिल्ली : सध्या महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. विविध क्षेत्रात काम करत भारताचे नाव उंचवताना पाहायला मिळत आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार आज (8 एप्रिलला) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी सुखोई 30 (Sukhoi 30) या लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. द्रौपदी मुर्मू यांनी तेजपूर हवाई अड्ड्यावरून सुखोई 30 MKI या लाढाऊ विमानानं उड्डाण केलं आहे. यावेळी राष्ट्रपती मुर्मू हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या.

दौपदी मुर्मू यांना भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. तसंच त्यांना सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुर्मू यांनी सुखोई 30 MKI या लढाऊ विमानानं हिमाचल प्रदेशकडे उड्डाण केलं.

दरम्यान, राष्ट्रपती मुर्मू या गुरूवारी ( 6 एप्रिल) आमास येथे दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचं आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया आणि मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा यांनी स्वागत केलं. त्यानंतर मुर्मू यांच्या हस्ते काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात फ्रिडा येथे ‘गज उत्सवा’चे उद्घाटन करण्यात आले. तसंच आज (8 एप्रिल) मुर्मू यांनी तेजपूर हवाई अड्ड्यावरुन सुखोई 30 MKI या लढाऊ विमानानं उड्डाण केलं.

महत्वाच्या बातम्या –

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.