Ayurvedic Herbs | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचा करा वापर

Ayurvedic Herbs | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी बहुतांश लोक ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र, सतत ब्युटी प्रॉडक्टचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करू शकतात. या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. खालील औषधी वनस्पतींचा वापर केल्याने त्वचेवरील डाग सहज दूर होऊ शकतात.

कडूलिंब (Neem -Ayurvedic Herbs for Skin Care)

कडूलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटीस्पेक्टिक, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास डागांवर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून एक ते दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.

जेष्ठमध (Jesthamadh -Ayurvedic Herbs for Skin Care)

आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी जेष्ठमध उपयुक्त ठरते. त्याचबरोबर त्वचेवरील अनेक समस्या दूर करण्यासाठी जेष्ठमध फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला ज्येष्ठमध पावडरची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास डागांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

पुदिना (Mint-Ayurvedic Herbs for Skin Care)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरू शकतो. पुदिन्यामध्ये आढळणारे विटामिन सी आणि इतर गुणधर्म त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला पुदिन्याच्या पानांची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाणी धुवावा लागेल.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही वरील औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर केसांना आल्याचे तेल लावल्याने खालील फायदे मिळू शकतात.

केसांतील कोंडा दूर होतो (Removes dandruff from hair-Ginger Oil Benefits)

केसातील कोंडा दूर करण्यासाठी आल्याचे तेल उपयुक्त ठरू शकते. आल्याच्या तेलामध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळूनमध्ये साचलेली घाण दूर करण्यास मदत करतात. परिणामी केसातील कोंडा दूर होतो. त्यामुळे तुम्ही जर केसातील कोंडा दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर आल्याचे तेल तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो.

केस गळती थांबते (Hair loss stops-Ginger Oil Benefits)

आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आल्याचे तेल उपयुक्त ठरू शकते. आल्याच्या तेलामध्ये आढळणारे विटामिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी गुणधर्म केस गळतीची समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला बदाम तेल किंवा खोबरेल तेलामध्ये आल्याचे तेल मिसळून ते केसांना लावावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण 1 तास केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या