Ginger Oil | केसांना आल्याचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Ginger Oil | टीम महाराष्ट्र देशा: आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर आले आपल्या केसांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. केसांची काळजी घेण्यासाठी आल्याचा रस किंवा आल्याचे तेल फायदेशीर ठरू शकते. आल्याच्या तेलामध्ये अँटिबॅक्टरियल, अँटिइप्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे केसांच्या समस्या (Hair problems) सोडवण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी आल्याचे तेल प्रभावी मानले जाते. केसांना नियमित आल्याचे तेल लावल्याने खालील फायदे मिळू शकतात.

केसांतील कोंडा दूर होतो (Removes dandruff from hair-Ginger Oil Benefits)

केसातील कोंडा दूर करण्यासाठी आल्याचे तेल उपयुक्त ठरू शकते. आल्याच्या तेलामध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळूनमध्ये साचलेली घाण दूर करण्यास मदत करतात. परिणामी केसातील कोंडा दूर होतो. त्यामुळे तुम्ही जर केसातील कोंडा दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर आल्याचे तेल तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो.

केस गळती थांबते (Hair loss stops-Ginger Oil Benefits)

आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आल्याचे तेल उपयुक्त ठरू शकते. आल्याच्या तेलामध्ये आढळणारे विटामिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी गुणधर्म केस गळतीची समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला बदाम तेल किंवा खोबरेल तेलामध्ये आल्याचे तेल मिसळून ते केसांना लावावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण 1 तास केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील.

केस चमकदार होतात (Hair becomes shiny-Ginger Oil Benefits)

आल्याचे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. यामध्ये आढळणारे फॅटी अॅसिड आणि इतर पोषक तत्व केसांना पोषण प्रदान करण्याचे काम करते. आल्याच्या तेलाच्या मदतीने केसांतील कोंडा दूर होतो.

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आल्याच्या तेलाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

काकडीचा रस (Cucumber juice For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडीच्या रसाचा समावेश करू शकतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. रिकाम्या पोटी काकडीच्या रसाचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

काकडीची कोशिंबीर (Cucumber salad For Weight Loss)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीच्या कोशिंबिरीचा समावेश करू शकतात. यासाठी तुम्हाला काकडीचे तुकडे करून त्यामध्ये लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळून घ्यावे लागेल. नियमित काकडीच्या कोशिंबिरीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button