Share

Sharad Pawar | भारतासमोर ‘हे’ तीन मुद्दे महत्वाचे : शरद पवार

Sharad Pawar | पुणे : सध्या अदाणी प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणावर राजकीय नेते भाष्य करताना पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची ( Sharad Pawar) भूमिका देखील चर्चेत आहे. अशात पवार यांनी या प्रकारात प्रश्न उपस्थित केला आहे. पवार म्हणाले की, अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. … Read more

Published On: 

Sharad Pawar | पुणे : सध्या अदाणी प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणावर राजकीय नेते भाष्य करताना पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची ( Sharad Pawar) भूमिका देखील चर्चेत आहे. अशात पवार यांनी या प्रकारात प्रश्न उपस्थित केला आहे. पवार म्हणाले की, अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. कारण संसदीय समितीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक हे सत्ताधारी पक्षाचे असतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर २१ लोकांची समिती तयार करण्यात आली तर त्यात १५ लोक सत्ताधारी पक्षाचे असतात. असं असताना सत्य कसं बाहेर येईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच देशात अदाणी यांच्या प्रश्नापेक्षाही तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

याचप्रमाणे पुढे शरद पवार म्हणाले की, आपल्या देशासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्याच्या समस्या. हे तीन प्रश्न देशासमोर सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत.  यामुळे अदाणी यांच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे मुद्दे देशात आहेत. ते सोडवण्याकडे विरोधकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मत शरद पवार यांनी मांडल आहे.

दरम्यान, शरद पवारांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे असं वाटतय का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले की, येऊ देत निर्णय कसाही आम्ही वाट बघतोय. तसा निर्णय आला तर योग्य भूमिका घेऊ.  एखाद्या प्रश्नावरून मतभेद असू शकतात त्यावर चर्चा करता येते त्यातून प्रश्न सुटतात असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसंच पुढे त्यांनी टाटा- बिर्ला यांच्या योगदानाबद्दल देखील भाष्य करत म्हंटल की, एक काळ असा होता ज्या काळात सत्ताधारी पक्षावर टीका करायची असेल तर आम्ही टाटा बिर्लांचं नाव घेत होतो. पण आता ही नावं घेतली जात नाहीत. कारण आता देशालाही समजलं आहे की टाटा आणि बिर्लांचं देशासाठी काय योगदान आहे. त्याचप्रमाणे अंबानि आणि अदाणी यांचंही देशासाठी योगदान आहे हे विसरता येणार नाही असंही शरद पवारांनी म्हटलं. त्यांनी अनेक विषयांवर स्पष्ट भाष्य करत विरोधकांचे कान टोचले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही