Department of Agriculture | कृषी विभाग नाशिक यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कृषी विभाग (Department of Agriculture) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये वरिष्ठ लिपिक पदाच्या 12 आणि सहाय्यक अधीक्षक पदाच्या 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Department of Agriculture) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Department of Agriculture) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)

https://ibpsonline.ibps.in/campmar23/

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.krishi.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या