Share

Sanjay Raut | संजय राऊतांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले…

Sanjay Raut | अहमदनगर | आज (7 एप्रिल) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राऊतांनी रात्री शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती, हा दावा खरा आहे का? असा सवाल माध्यमांनी राऊतांना विचारला. यावर संजय राऊत म्हणाले, मला आणि शरद पवारांना रात्रीच्या काळोखात भेटण्याची गरज नाही.

तसंच पुढे राऊत म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याइतकच शरद पवारांना स्थान देतो. मला राजकारणात बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं. पण माझ्यासाठी शरद पवार देखील आधारस्तंभ आहेत. तसंच शरद पवार रात्रीच्या काळोखात गाठीभेटी घेत नाहीत. मी त्या दिवशी शिवसेना भवनात होतो. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली आणि तिथून मी शरद पवारांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेलो.

दरम्यान, मी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे गेलो होतो. त्यानंतर मी माध्यमांना मुलाखती दिल्या. तेव्हा मला त्यांनी विचारलं, तुम्ही येथे कशासाठी आला आहात? मी त्यांना म्हणालो, सत्ता स्थापनेसाठी आलो आहे. सरकार बनवायला आलो आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

Sanjay Raut | अहमदनगर | आज (7 एप्रिल) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now