Share

Golden Globe | पत्रकार नरेंद्र बंडबे यांची मतदार म्हणून ‘गोल्डन ग्लोब’साठी निवड

Golden Globe | मुंबई : 2023 हे वर्ष भारतीय कलाक्षेत्रासाठी खास ठरतंय. आंतररराष्ट्रीय तापळीवर भारतातील कलाकृतींचा गौरव होताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यानं प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ आणि ‘गोल्डन ग्लोब’वर (Golden Globe) मोहोर उमटली आहे. हा तमाम भारतीयांसाठी आणि भारतीय चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण होता. त्यानंतर आता महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानास्पद बातमी … Read more

Published On: 

Golden Globe | मुंबई : 2023 हे वर्ष भारतीय कलाक्षेत्रासाठी खास ठरतंय. आंतररराष्ट्रीय तापळीवर भारतातील कलाकृतींचा गौरव होताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यानं प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ आणि ‘गोल्डन ग्लोब’वर (Golden Globe) मोहोर उमटली आहे. हा तमाम भारतीयांसाठी आणि भारतीय चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण होता. त्यानंतर आता महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.

जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’चा आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून मुंबईतले पत्रकार नरेंद्र बंडबे (Narendra Bandabe) यांची निवड झाली आहे. तर यावर्षी या पुरस्काराचे 81 वे वर्ष असून त्यासाठी बंडबे यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून भारतातून निवडल्या गेलेल्या काही ठराविक पत्रकारांपैकी ते एक ठरले आहेत.

तसेच नरेंद्र बंडबे जागतिक सिनेमांचे मराठी भाषेतून समीक्षण करत असतात. गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून निवड झालेले ते एकमेव मराठी चित्रपट समीक्षक ठरले आहेत. सध्या जगभरात गोल्डन ग्लोब पुरस्कराचे 200 हून अधिक मतदार आहेत.

या गोल्डन ग्लोबबद्दल बोलायच झालं तर, ‘द हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन’ (HFPA) तर्फे ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ 1944 सालापासून देण्यात येतो. ज्यासाठी जगातल्या 62 देशांमधले मतदार मतदान करतात. सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रासाठीचे पुरस्कार या नावाखाली देण्यात येतात. गेल्या वर्षी जगभरातून १०३ पत्रकारांची मतदार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यात मिनाक्षी शेड्डे या एकमेव भारतीय पत्रकार होत्या. यावर्षी त्यात नरेंद्र बंडबे यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही