Redness On Face | उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Redness On Face | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin Care) अधिक घ्यावी लागते. कारण या वातावरणात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे अनेकांना चेहऱ्यावर लालसरपणा येण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत त्वचा लाल होते आणि जळजळ होते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम आणि लोशनचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती पद्धतीचा अवलंब करू शकतात.

मध (Honey For Redness On Face)

त्वचेची काळजी घेण्यासाठी मध खूप फायदेशीर ठरू शकतो. मधामध्ये आढळणारे अँटिइफ्लिमेंटरी गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर मधाच्या मदतीने त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर मध लावून ठेवावा लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. दिवसातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने त्वचेवरील लालसरपणा सहज दूर होऊ शकतो.

कोरफड (Aloevera For Redness On Face)

कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. म्हणून कोरफड आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर येणारा लालसरपणा दूर करण्यासाठी कोरफड मदत करू शकते. यासाठी तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावर कोरफडीचा गर साधारण अर्धा तास लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. दिवसातून दोन वेळा कोरफड चेहऱ्यावर लावल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकतो.

गुलाब जल (Rose water For Redness On Face)

चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी गुलाब जल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला गुलाब जलमध्ये थोडासा काकडीचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित असे केल्याने चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात.त्याचबरोबर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील घरगुती फेस स्क्रब वापरू शकतात.

लिंबू, साखर आणि मध (Lemon sugar and honey-Face Scrub)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिंबू, साखर आणि मधाचा फेस स्क्रब वापरू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा बारीक साखर मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावावे लागेल. स्क्रबिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला गुलाबजल लावावे लागेल. नियमित या फेस स्क्रबचा वापर केल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी होऊ शकते.

सोयाबीन फेस स्क्रब (Soybean Face Scrub-Face Scrub)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सोयाबीनच्या बियापासून बनवलेल्या फेस स्क्रबचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला सोयाबीनच्या बिया बारीक करून घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून स्क्रब करावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.