Political news| Amol Kolhe| राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार? चंद्रकांत पाटलांची सूचक टिप्पणी!

Amol Kolhe| पुणे : सध्या राज्यात भाजपने आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकिसाठी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कारण अमोल कोल्हेंनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात झालेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचं प्रचारचिन्ह शिट्टी फुंकून अप्रत्यक्षपणे त्यांचा प्रचार केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यावर स्पष्टीकरण देत कोणीही कोणताही गैरसमज करून न घेण्याचं आवाहनही त्यांनी त्यावेळी केलं होतं.

परंतु, आता अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चां होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका मुलाखतीदरम्यान केलेल्या विधानामुळे अमोल कोल्हें पुन्हा चर्चात आले आहेत. तसेच त्यांनी शिंदे गट आणि भाजप यांच्यात आगामी निवडणूकिमध्ये जागा वाटपाबद्दल देखील भाष्य केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिंदे गटाकडे ३९ अधिक १० म्हणजेच ४९ संख्याबळ आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना तेवढ्यावरच थांबवायचं असा कोणताही विषय भाजपमधील कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यात नाही. पण गेल्या काही दिवसांपूर्वी बावनकुळें यांनी जे काही विधान केलं त्यावेळी त्यांना तसं म्हणायचं नव्हतं असं पाटील यांनी सांगितलं. तसेच आत्ताच निर्णय घेतला जाणार नाही तर याबद्दल सर्वे होतील, बैठका होतील. असं देखील पाटील म्हणाले. याचप्रमाणे त्यांनी मुलाखती दरम्यान एक उदाहरण दिल. राज्यातील हातकणंगले किंवा शिरूरसारख्या मतदारसंघांचं काय करायचं असे विषय देखील चर्चेला येतील.

दरम्यान, बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या वेळी शिरूर मतदानसंघातून आढळराव पाटील लढले होते. तर २०१९ला तिथे आढळरावांना पाडून अमोल कोल्हे खासदार झाले. पण समजा जर अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी असं वाटू शकतं की आपण भाजपामध्ये प्रवेश करावा. मग विद्यमान खासदार म्हणून त्यांनाच तिकीट द्यावं लागेल.  पण मग विषय येईल की ते कुणाकडून लढणार? शिंदेंकडून की भाजपाकडून? मग त्यांना विचारलं जाईल. असं चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.