Sunburn | सनबर्न दूर करण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Sunburn | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये सनबर्न ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सनस्क्रीनचा वापर करतात. मात्र, सतत सनस्क्रीनचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकतात. हे आयुर्वेदिक उपाय केल्याने टॅनिंग सहज दूर होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये सनबर्न दूर करण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करू शकतात.

कोकोनट मिल्क (Coconut milk-For Sunburn)

सनबर्न दूर करण्यासाठी कोकोनट मिल्क उपयुक्त ठरू शकते. याचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. सनबर्न दूर करण्यासाठी तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे कोकोनट मिल्क त्वचेवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा थंड पाण्याने धुवावी लागेल. कोकोनट मिल्कमध्ये आढळणारे लॅक्टिक ऍसिड आणि विटामिन सी टॅनिंग दूर करण्यास मदत करतात.

कोरफड (Aloevera-For Sunburn)

कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर केल्या जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म सनबर्न दूर करण्यास मदत करतात.

काकडीचा रस (Cucumber juice-For Sunburn)

उन्हाळ्यामध्ये सनबर्नची समस्या दूर करण्यासाठी काकडीचा रस मदत करू शकतो. काकडीचा रस त्वचेसाठी नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करतो. यासाठी तुम्हाला कापसाच्या मदतीने काकडीचा रस चेहऱ्याला लावावा लागेल. साधारण दहा मिनिटे तुम्हाला हा रस चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल.

सनबर्न दूर करण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात.

खसखस (khaskhas-For Weight Gain)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक खसखसचे सेवन करतात. कारण या गरम वातावरणामध्ये खसखसचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. खसखसमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही दुधात मिसळून खसखसचे सेवन करू शकतात.

पनीर आणि चीज (Paneer and cheese-For Weight Gain)

उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीर आणि चीजचा समावेश करू शकतात. पनीर आणि चीजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन वाढवण्यासाठी उपाय शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात पनीर आणि चीजचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.