Share

Weather Update | पुढचे 48 तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार पावसाची शक्यता

🕒 1 min readWeather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अशात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अशात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

राज्यामध्ये आजपासून (7 एप्रिल) वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपिटीचा देखील  इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नांदेड, उस्मानाबाद, लातूर, मुंबई, नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागल्या आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यात मुंबई, अलिबाग, कोल्हापूर, सांगली, सातारा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी या ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. तर किमान तापमानाचा पारा 15 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!