Maharashtra Excise Department | टीम महाराष्ट्र देशा: राज्य उत्पादक शुल्क विभागाअंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
राज्य उत्पादन शुल्क विभाग (Maharashtra Excise Department) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 37 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विधी सल्लागार / Legal Adviser 01 जागा, विधी अधिकारी (गट-अ) / Legal Officer (Group-A) 20 जागा, विधी अधिकारी (गट-ब) / Legal Officer (Group-B) 16 जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Maharashtra Excise Department) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Maharashtra Excise Department) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001.
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1Zef__oT9eVzVhVyh5VUDb7MMabQ1iL6g/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Green Tea | मासिक पाळीमध्ये ग्रीन टीचे सेवन केल्याने ‘या’ समस्यांपासून मिळू शकतो आराम
- Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Alovera | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Milk and Pohe | सकाळी ब्रेकफास्टमध्ये दूध आणि पोह्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Weight Gain | उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश