Green Tea | मासिक पाळीमध्ये ग्रीन टीचे सेवन केल्याने ‘या’ समस्यांपासून मिळू शकतो आराम

Green Tea | टीम महाराष्ट्र देशा: ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी ग्रीन टीचे सेवन करतात. त्याचबरोबर महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान ग्रीन टीचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. मासिक पाळी (Period) सुरू असताना ग्रीन टीचे सेवन केल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला मासिक पाळी सुरू असताना दिवसातून दोन कप म्हणजेच 250मिली ते 300मिली ग्रीन टीचे सेवन करावे लागेल. दोन कपपेक्षा जास्त ग्रीन टीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मासिक पाळी सुरू असताना ग्रीन टीचे सेवन केल्याने खालील समस्यांपासून आराम मिळू शकतो.

वेदना कमी होतात (The pain was less-Green Tea In Period)

मासिक पाळी सुरू असताना महिलांना वेदना, अस्वस्थता इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचे सेवन करू शकतात. मासिक पाळी सुरू असताना दिवसातून एक ते दोन कप ग्रीन टी प्यायल्याने पोटदुखी आणि क्रॅम्प्सपासून आराम मिळू शकतो. ग्रीन टीचे सेवन केल्याने रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन वेगाने वाहण्यास मदत होते, परिणामी वेदनांपासून आराम मिळतो.

सूज कमी होत (Swelling decreases-Green Tea In Period)

मासिक पाळी सुरू असताना बहुतांश महिलांना खालच्या ओटीपोटात सूज येण्याची समस्या निर्माण होते. पोटावर आलेली ही सूज कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आढळून येते, जे खालच्या ओटीपोटाची सूज कमी करण्यास मदत करते.

तणाव कमी होतो (Reduces stress-Green Tea In Period)

मासिक पाळी सुरू असताना महिलांना तणावाला सामोरे जावे लागते. या तणावामुळे महिलांना चिडचिड, राग इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ग्रीन टीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. ग्रीन टी मुड सुधारण्याचे काम करते. त्याचबरोबर ग्रीन टीमध्ये आढळणारे गुणधर्म मेंदूच्या मज्जातंतूंना शांत करण्यास मदत करतात.

मासिक पाळी सुरू असताना ग्रीन टीचे सेवन केल्याने वरील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर सकाळी ब्रेकफास्टमध्ये दूध आणि पोह्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

वजन कमी होण्यास मदत होते (Helps in weight loss-Milk and Pohe Benefits)

पोहे आणि दूध या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आढळून येते, जे वजन कमी करण्यास मदत करते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. भूक नियंत्रणात राहण्यामुळे तुम्ही अतिरिक्त पदार्थांचे सेवन करणे टाळतात. परिणामी वजन कमी होते.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Milk and Pohe Benefits)

दूध आणि पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. त्यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये दूध आणि पोह्यांचे सेवन केल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. त्याचबरोबर या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात या मिश्रणाचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या