Alovera | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Alovera | टीम महाराष्ट्र देशा: कोरफड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर कोरफड आपल्या त्वचेसाठी (Skin Care) आणि केसांसाठी (Hair Care) देखील उपयुक्त ठरू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी कोरफड मदत करू शकते. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने कोरफडीचा वापर करू शकतात.

लिंबाचा रस आणि कोरफड (Lemon juice And Alovera-For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफड आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला 5 ते 6 चमचे कोरफडीच्या गरामध्ये 5 ते 6 चमचे लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने टाळूची पीएच पातळी संतुलित राहते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकतात.

ॲपल व्हिनेगर आणि कोरफड (Apple Vinegar And Alovera-For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीसोबत ॲपल व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. या दोन्हीमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला चार ते पाच चमचे कोरफडीच्या गरामध्ये थोडेसे ॲपल व्हिनेगर मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस थंड पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाचा वापर केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

खोबरेल तेल आणि कोरफड (Coconut oil And Alovera-For Hair Care)

खोबरेल तेल आणि कोरफडीच्या मदतीने केस निरोगी राहू शकतात. यासाठी तुम्हाला आवश्यकतेनुसार खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस शाम्पूने धुवावे लागतील. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने कोरफडीचा वापर करू शकतात. त्याचबरोबर वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात.

खसखस (khaskhas-For Weight Gain)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक खसखसचे सेवन करतात. कारण या गरम वातावरणामध्ये खसखसचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. खसखसमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही दुधात मिसळून खसखसचे सेवन करू शकतात.

पनीर आणि चीज (Paneer and cheese-For Weight Gain)

उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीर आणि चीजचा समावेश करू शकतात. पनीर आणि चीजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन वाढवण्यासाठी उपाय शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात पनीर आणि चीजचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button