Weight Gain | उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Weight Gain | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बहुतांश लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. तर, अनेक लोक वजन कमी आहे म्हणून चिंतेत असतात. वजन वाढवण्यासाठी अनेकदा लोक जंक फूडचे सेवन करतात. मात्र, सतत जंक फूडचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पोषक घटकांचा समावेश करू शकतात. या गोष्टींचे सेवन केल्याने वजन वाढण्यासोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात.

खसखस (khaskhas-For Weight Gain)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक खसखसचे सेवन करतात. कारण या गरम वातावरणामध्ये खसखसचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. खसखसमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही दुधात मिसळून खसखसचे सेवन करू शकतात.

पनीर आणि चीज (Paneer and cheese-For Weight Gain)

उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीर आणि चीजचा समावेश करू शकतात. पनीर आणि चीजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन वाढवण्यासाठी उपाय शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात पनीर आणि चीजचा समावेश करू शकतात.

स्मृदी आणि शेक (Smoothies and shakes-For Weight Gain)

उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी स्मूदी आणि शेक उत्तम उपाय ठरू शकतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही फ्रूट स्मूदी, ड्रायफ्रूट्स स्मूदी इत्यादींचे सेवन करू शकतात. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, फॅट आणि प्रोटीन आढळून येते, जे वजन वाढवण्यास मदत करू शकते. त्याचबरोबर स्मूदी आणि शेकचे सेवन केल्याने उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला थंडावा मिळू शकतो.

उन्हाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी केळी आणि दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Banana And Curd Benefits)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर केळी आणि दह्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी दही आणि केळी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. दही आणि केळीचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Banana And Curd Benefits)

सकाळी रिकाम्या पोटी केळी आणि दह्याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहू शकते. नियमित सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने तुम्ही पोटाशी निगडित गॅस, बद्धकोष्टता, ऍसिडिटी, अपचन इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात. सकाळी रिकाम्या केळी आणि दह्याचे सेवन केल्याने पोट निरोगी राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.