Weather Update | नागरिकांनो सतर्क रहा! राज्यात पावसासह गारपिटीचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) जाणवायला लागल्या आहे. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला (Rain) पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यामध्ये पुढील 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय (A low pressure area is active in the Bay of Bengal)

बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उद्या (7 एप्रिल) गारपिट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत चंद्रपूर जिल्ह्यात देशातील उच्चांकी म्हणजेच 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची (Weather Update) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यामध्ये अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, सोलापूर, परभणी, वाशिम, वर्धा या ठिकाणी 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 35 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान होता. तर किमान तापमानाचा पारा 14 ते 25 अंश सेल्सिअस होता.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.