Sun Exposure | उन्हातून आल्यानंतर चेहऱ्याला काय लावावे? जाणून घ्या

Sun Exposure | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin Care) अधिक घ्यावी लागते. उष्णतेमुळे या वातावरणात त्वचेला जळजळ होणे, सनबर्न इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि सिरम वापरतात. मात्र, ही उत्पादन ही त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतात. या नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उन्हातून आल्यावर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींचा वापर करू शकतात.

कोरफड (Aloevera-Apply After Sun Exposure)

कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोरफड लावल्याने थंडावा मिळतो आणि टॅनिंगची समस्या दूर होते. उन्हातून आल्यावर तुम्ही चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावू शकतात. कोरफडीचा गर लावून तुम्हाला चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला नियमित कोरफड लावल्याने त्वचा निरोगी राहू शकते.

मध (Honey-Apply After Sun Exposure)

मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. उन्हातून आल्यावर तुम्ही त्वचेवर मध लावू शकतात. तुम्हाला साधारण दहा मिनिटे मधाचा पातळ थर चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. दहा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. उन्हाळ्यामध्ये मधाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

काकडीचा रस (Cucumber juice-Apply After Sun Exposure)

उन्हातून आल्यानंतर काकडीचा रस चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला साधारण 10 मिनिटे काकडीचा रस चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. दहा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. उन्हाळ्यामध्ये नियमित काकडीचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार आणि मऊ होऊ शकते.

उन्हातून आल्यानंतर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील गोष्टींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांना सनस्क्रीन लावल्याने खालील फायदे मिळू शकतात.

सूर्यकिरणांपासून संरक्षण (Protection from sun rays-Sunscreen For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामुळे सनस्क्रीन लावून बाहेर पडल्याने केस सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहू शकतात. उन्हाळ्यामध्ये दररोज सकाळी केसांना सनस्क्रीन लावल्याने केस निरोगी आणि सुंदर राहू शकतात.

केसांमध्ये ओलावा टिकून राहतो (Retains moisture in hair-Sunscreen For Hair Care)

सूर्यप्रकाशामुळे केस आणि टाळूतील तेल कमी होऊ लागते. त्यामुळे कोरडे केस आणि निर्जीव केसांच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही नियमित केसांना सनस्क्रीन लावू शकतात. सनस्क्रीनचा वापर केल्याने केसातील ओलावा कायम टिकून राहतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.