Share

Sunscreen | केसांना सनस्क्रीन लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

🕒 1 min readSunscreen | टीम महाराष्ट्र देशा: सनस्क्रीनबद्दल सर्वांनीच ऐकले आहे. सनस्क्रीन नेहमी त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपले केस स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करून घ्यावे लागतील. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sunscreen | टीम महाराष्ट्र देशा: सनस्क्रीनबद्दल सर्वांनीच ऐकले आहे. सनस्क्रीन नेहमी त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपले केस स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करून घ्यावे लागतील. त्यानंतर केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत तुम्हाला सनस्क्रीन लावावी लागेल. उन्हाळ्यामध्ये नियमित केसांना सनस्क्रीन लावल्याने खालील फायदे मिळू शकतात.

सूर्यकिरणांपासून संरक्षण (Protection from sun rays-Sunscreen For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामुळे सनस्क्रीन लावून बाहेर पडल्याने केस सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहू शकतात. उन्हाळ्यामध्ये दररोज सकाळी केसांना सनस्क्रीन लावल्याने केस निरोगी आणि सुंदर राहू शकतात.

केसांमध्ये ओलावा टिकून राहतो (Retains moisture in hair-Sunscreen For Hair Care)

सूर्यप्रकाशामुळे केस आणि टाळूतील तेल कमी होऊ लागते. त्यामुळे कोरडे केस आणि निर्जीव केसांच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही नियमित केसांना सनस्क्रीन लावू शकतात. सनस्क्रीनचा वापर केल्याने केसातील ओलावा कायम टिकून राहतो.

केस चमकदार राहतात (Hair stays shiny-Sunscreen For Hair Care)

सूर्यप्रकाश धूळ आणि प्रदूषणामुळे केसांवरील चमक कमी व्हायला लागते. केसावरील चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही नियमित केसांना सनस्क्रीन लावू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नियमित सनस्क्रीनचा वापर केल्याने केसांचे सौंदर्य टिकून राहते.

उन्हाळ्यामध्ये केसांना सनस्क्रीन लावल्याने खालील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये डीहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील फळांचा समावेश करू शकतात.

टरबूज (Watermelon-For Dehydration)

डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी टरबूज उपयुक्त ठरू शकते. टरबूजामध्ये 90% पाणी आणि विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यामध्ये हायड्रेट राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही टरबुजाचे सेवन करू शकतात.

डाळिंब (Pomegranate-For Dehydration)

उन्हाळ्यामध्ये डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्याचबरोबर डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये डाळिंबाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचन इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या