Dehydration | उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Dehydration | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये (Summer) आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या वातावरणात उन्हामुळे आणि घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता म्हणजेच डीहायड्रेशनची समस्या होणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतात. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील फळांचा समावेश करू शकतात.

द्राक्ष (Grapes-For Dehydration)

उन्हाळ्यामध्ये द्राक्षांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण द्राक्षामध्ये 70% हून अधिक पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर द्राक्षांमध्ये आढळणारे पोटॅशियम उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी द्राक्षाचे सेवन करू शकतात.

टरबूज (Watermelon-For Dehydration)

डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी टरबूज उपयुक्त ठरू शकते. टरबूजामध्ये 90% पाणी आणि विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यामध्ये हायड्रेट राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही टरबुजाचे सेवन करू शकतात.

डाळिंब (Pomegranate-For Dehydration)

उन्हाळ्यामध्ये डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्याचबरोबर डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये डाळिंबाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचन इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील फळांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींचे सेवन करू शकतात.

केळी (Banana-For Instant Energy)

केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी, पोटॅशियम, आयरन, सोडियम इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचा समावेश करू शकतात.

रताळे (Sweet potatoes-For Instant Energy)

रताळे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते. रताळ्याचे सेवन केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवाही दूर होतो. कारण रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, सोडियम, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी आढळून येते, जे थकवा दूर करण्यास मदत करते. त्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही रताळ्याचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.