Share

Weather Update | ‘या’ जिल्ह्यांवर पुढचे तीन दिवस अवकाळीचे सावट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात (Climate) सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. तर कुठे उन्हाचा चटका वाढत चालला आहे. अशाच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस  (Unseasonal rain) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात (Climate) सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. तर कुठे उन्हाचा चटका वाढत चालला आहे. अशाच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस  (Unseasonal rain) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये देखील पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place)

राज्यामध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिली आहे.

शुक्रवारी (7 एप्रिल) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गतील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) आहे. तर पुणे, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम या ठिकाणी शुक्रवारपर्यंत पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही