Black Lip | ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Black Lip | टीम महाराष्ट्र देशा: सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिकचा वापर करतात. कारण अनेकदा ओठांचा रंग चेहऱ्याच्या रंगाशी जुळत नाही. त्यामुळे अनेकजण लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टिक दीर्घकाळ ओठांचा काळेपणा लपवू शकत नाही. म्हणूनच ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात.

लिंबू (Lemon-For Black Lip)

ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लिंबू लावावे लागेल. झोपण्यापूर्वी तुम्हाला लिंबाच्या मदतीने हलक्या हाताने ओठांवर मसाज करावी लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागतील. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या ओठांमध्ये फरक जाणवेल.

हळद (Turmeric-For Black Lip)

हळदीच्या मदतीने ओठांवरील काळेपणा सहज दूर केल्या जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला हळदीमध्ये आवश्यकतेनुसार दूध मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागतील. ओठ धुतल्यानंतर त्यांना लिपबाम लावायला विसरू नका.

खोबरेल तेल (Coconut oil-For Black Lip)

त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी ओठांवर खोबरेल तेल लावले लागेल. नियमित ओठांवर खोबरेल तेल लावल्याने तुम्हाला तुमच्या ओठांमध्ये फरक जाणवेल.

ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतींचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात.

काकडी (Cucumber-For Heat Stroke)

उन्हाळ्यामध्ये काकडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्याचबरोबर काकडीमध्ये विटामिन सी, विटामिन के, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नियमित काकडीचे सेवन केल्याने तुम्ही उष्णघातापासून दूर राहू शकतात.

दही (Curd-For Heat Stroke)

दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दही शरीरात प्रोबायोटिकचे काम करते. दह्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत राहते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नियमित दह्याचे सेवन केल्याने तुम्ही उष्माघातापासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button