Instant Energy | झटपट एनर्जी मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टींचे करा सेवन

Instant Energy | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या गोष्टीमुळे अति थकवा येणे, शरीरातील ऊर्जा कमी होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. या समस्यांवर मात करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. झटपट एनर्जी मिळवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात.

चने (Chickpeas-For Instant Energy)

झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात चण्याचा समावेश करू शकतात. चने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. चण्याच्या नियमित सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर नियमित चने खाल्ल्याने शरीरही तंदुरुस्त राहते. यासाठी तुम्ही मोड आलेल्या चण्याचे सेवन करू शकतात. मोड आलेल्या चाण्यांचे सेवन केल्याने शरीरातील थकवा दूर होऊ शकतो.

केळी (Banana-For Instant Energy)

केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी, पोटॅशियम, आयरन, सोडियम इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचा समावेश करू शकतात.

रताळे (Sweet potatoes-For Instant Energy)

रताळे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते. रताळ्याचे सेवन केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवाही दूर होतो. कारण रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, सोडियम, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी आढळून येते, जे थकवा दूर करण्यास मदत करते. त्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही रताळ्याचे सेवन करू शकतात.

इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

लिंबू (Lemon-For Black Lip)

ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लिंबू लावावे लागेल. झोपण्यापूर्वी तुम्हाला लिंबाच्या मदतीने हलक्या हाताने ओठांवर मसाज करावी लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागतील. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या ओठांमध्ये फरक जाणवेल.

हळद (Turmeric-For Black Lip)

हळदीच्या मदतीने ओठांवरील काळेपणा सहज दूर केल्या जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला हळदीमध्ये आवश्यकतेनुसार दूध मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागतील. ओठ धुतल्यानंतर त्यांना लिपबाम लावायला विसरू नका.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या