Health And Fitness | शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ सुपरफुड्सचा समावेश

Health And Fitness | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतांश लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये अनेकांना डायबिटीज, हाय-ब्लड प्रेशर इत्यादी गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात. या पदार्थांमध्ये आढळणारे पोषक तत्व शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील सुपरफुड्सचा समावेश करू शकतात.

सफरचंद (Apple-For Health And Fitness)

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन आणि इतर जीवनसत्व आढळून येतात, जे शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात. दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण नियमित सफरचंदाचे सेवन केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

मूग डाळ (Moong dal-For Health And Fitness)

मूग डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर आढळून येते. मुगाच्या डाळीचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोज टॉलरन्स सुधारण्यास मदत होते.

तूप (Ghee-For Health And Fitness)

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुपाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. नियमित तुपाचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुपाचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील पदार्थांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करू शकतात.

द्राक्ष (Grapes-For Dehydration)

उन्हाळ्यामध्ये द्राक्षांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण द्राक्षामध्ये 70% हून अधिक पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर द्राक्षांमध्ये आढळणारे पोटॅशियम उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी द्राक्षाचे सेवन करू शकतात.

टरबूज (Watermelon-For Dehydration)

डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी टरबूज उपयुक्त ठरू शकते. टरबूजामध्ये 90% पाणी आणि विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यामध्ये हायड्रेट राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही टरबुजाचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.