Healthy Brain | मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Healthy Brain | टीम महाराष्ट्र देशा: निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराचे (Proper diet) सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरासोबतच मेंदू निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे. आपण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो. त्याचबरोबर मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी देखील तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने मेंदूला अतिरिक्त पोषण मिळते आणि मेंदू तंदुरुस्त राहतो. आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश केल्याने मेंदू मजबूत आणि तंदुरुस्त राहू शकतो.

हिरव्या भाज्या (Green vegetables-For Healthy Brain)

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आणि मॅग्नेशियम आढळून येते, जे मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत करते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही पालक, मेथी इत्यादी भाज्यांचे सेवन करू शकतात. हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन केल्याने नर्व्हस सिस्टीम देखील योग्य प्रकारे कार्य करू शकते.

डार्क चॉकलेट (Dark chocolate-For Healthy Brain)

डार्क चॉकलेट लहान मुलांसोबत सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर डार्क चॉकलेटचे नियमित सेवन केल्याने मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते.

ब्रोकोली (Broccoli-For Healthy Brain)

ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन के आढळून येते, जे मेंदूची शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर ब्रोकोलीमध्ये ग्लुकोसिनोलेट्स आढळून येतात, जे नर्व्हस सिस्टिमला मजबूत बनवण्याचे काम करते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकतात.

मेंदूला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही खालील सुपरफुड्स सेवन करू शकतात.

सफरचंद (Apple-For Health And Fitness)

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन आणि इतर जीवनसत्व आढळून येतात, जे शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात. दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण नियमित सफरचंदाचे सेवन केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

मूग डाळ (Moong dal-For Health And Fitness)

मूग डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर आढळून येते. मुगाच्या डाळीचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोज टॉलरन्स सुधारण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button