Milk and Pohe | सकाळी ब्रेकफास्टमध्ये दूध आणि पोह्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Milk and Pohe | टीम महाराष्ट्र देशा: दिवसाची सुरुवात पोषक ब्रेकफास्टने करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामध्ये बहुतांश लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन करतात. त्याचबरोबर सकाळी दूध आणि पोह्यांचे एकत्र सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. यासाठी तुम्हाला आवश्यकतेनुसार दूध गरम करून घ्यावे लागेल. त्यानंतर या गरम दुधामध्ये तुम्हाला साधारण दहा मिनिटे पोहे टाकून ठेवावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मिश्रणामध्ये मध देखील मिसळू शकतात. सकाळी ब्रेकफास्टमध्ये या मिश्रणाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

वजन कमी होण्यास मदत होते (Helps in weight loss-Milk and Pohe Benefits)

पोहे आणि दूध या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आढळून येते, जे वजन कमी करण्यास मदत करते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. भूक नियंत्रणात राहण्यामुळे तुम्ही अतिरिक्त पदार्थांचे सेवन करणे टाळतात. परिणामी वजन कमी होते.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Milk and Pohe Benefits)

दूध आणि पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. त्यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये दूध आणि पोह्यांचे सेवन केल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. त्याचबरोबर या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात या मिश्रणाचा समावेश करू शकतात.

पचनक्रिया मजबूत होते (Digestion is strengthened-Milk and Pohe Benefits)

दूध आणि पोह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळून येतात, जे आतड्यांसाठी चांगले मानले जातात. याच्या नियमित सेवनाने तुम्ही पोट दुखी, गॅस, बद्धकोष्टता, उलट्या, अपचन यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकतात. पोट निरोगी ठेण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचे सेवन करून शकतात.

सकाळी ब्रेकफास्टमध्ये दूध आणि पोह्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात.

सफरचंद (Apple-For Health And Fitness)

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन आणि इतर जीवनसत्व आढळून येतात, जे शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात. दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण नियमित सफरचंदाचे सेवन केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

मूग डाळ (Moong dal-For Health And Fitness)

मूग डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर आढळून येते. मुगाच्या डाळीचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोज टॉलरन्स सुधारण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.