Face Scrub | त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती फेस स्क्रब

Face Scrub | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकजण त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट किंवा रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. मात, सतत या पद्धतींचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील घरगुती फेस स्क्रबचा वापर करू शकतात.

लिंबू, साखर आणि मध (Lemon sugar and honey-Face Scrub)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिंबू, साखर आणि मधाचा फेस स्क्रब वापरू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा बारीक साखर मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावावे लागेल. स्क्रबिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला गुलाबजल लावावे लागेल. नियमित या फेस स्क्रबचा वापर केल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी होऊ शकते.

सोयाबीन फेस स्क्रब (Soybean Face Scrub-Face Scrub)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सोयाबीनच्या बियापासून बनवलेल्या फेस स्क्रबचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला सोयाबीनच्या बिया बारीक करून घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून स्क्रब करावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते.

बदाम आणि मध (Almonds and honey-Face Scrub)

बदाम आणि मधापासून बनवलेला फेस स्क्रब त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला बदाम साधारण दोन तास पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. दोन तासानंतर तुम्हाला त्या बदामांची पेस्ट तयार करून त्यामध्ये दोन ते तीन चमचे मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर स्क्रबिंग करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवावा लागेल.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील फेस स्क्रबचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या खालील पद्धतीने वापर करू शकतात.

लिंबाचा रस आणि कोरफड (Lemon juice And Alovera-For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफड आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला 5 ते 6 चमचे कोरफडीच्या गरामध्ये 5 ते 6 चमचे लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने टाळूची पीएच पातळी संतुलित राहते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकतात.

ॲपल व्हिनेगर आणि कोरफड (Apple Vinegar And Alovera-For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीसोबत ॲपल व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. या दोन्हीमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला चार ते पाच चमचे कोरफडीच्या गरामध्ये थोडेसे ॲपल व्हिनेगर मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस थंड पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाचा वापर केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button