Back Pain | पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहात? तर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Back Pain | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य खाण्यापिण्याचे सवयीमुळे बहुतांश लोक पाठदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पाठदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपचारांचा (Ayurvedic Treatment) अवलंब करू शकतात. हे आयुर्वेदिक उपचार केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक उपचार करू शकतात.

अश्वगंधा (Ashwagandha-For Back Pain)

अश्वगंधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे अनेक समस्यांवर मात करण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. पाठदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला अश्वगंधाचे मूळ पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर या पाण्याचे तुम्हाला दिवसातून दोनदा सेवन करावे लागेल. नियमित याचे सेवन केल्याने तुमची पाठदुखीची समस्या दूर होऊ शकते.

एरंडेल तेल (Castor oil-For Back Pain)

पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरू शकते. एरंडेल तेलाच्या मदतीने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंच्या ताण कमी होते. पाठदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला पाठीला साधारण 10 मिनिटे एरंडेल तेलाने मसाज करावी लागेल. नियमित असे केल्याने हळूहळू पाठ दुखीची समस्या कमी होऊ शकते.

तुळस (Basil-For Back Pain)

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आयुर्वेदामध्ये तुळशीचा उपयोग अनेक समस्यांवर मात करण्यासाठी उपचार म्हणून केला जातो. पाठदुखीची समस्या दूर करण्यासाठी तुळस मदत करू शकते. तुळशीमध्ये आढळणारे गुणधर्म पाठदुखी दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी तुळशीचा चहा प्यावा लागेल. नियमित या चहाचे सेवन केल्याने तुमची पाठदुखीची समस्या दूर होऊ शकते.

पाठदुखीच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

लिंबाचा रस आणि कोरफड (Lemon juice And Alovera-For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफड आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला 5 ते 6 चमचे कोरफडीच्या गरामध्ये 5 ते 6 चमचे लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने टाळूची पीएच पातळी संतुलित राहते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकतात.

ॲपल व्हिनेगर आणि कोरफड (Apple Vinegar And Alovera-For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीसोबत ॲपल व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. या दोन्हीमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला चार ते पाच चमचे कोरफडीच्या गरामध्ये थोडेसे ॲपल व्हिनेगर मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस थंड पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाचा वापर केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.