India Meteorological Department |हवामान विभागाने नोंदवली ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह गारपीटीची शक्यता !

India Meteorological Department (IMD)| गेल्या काही दिवसांपासून  राज्यात उष्णतेचा पारा वाढत चाललेला पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८०३ नव्या रूग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यूसह महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोनाचा कहर पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये भर पडत आहे. यातच गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट( Heat wave) देखिल अधिकच वाढलेली पाहायला मिळाली. तर आता काही जिल्ह्यांना पुन्हा अवकाळीचा फटका बसणार असल्याचं हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. याचप्रमाणे अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह गारपीट होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर(Senior Scientist K.S Hosalikar) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये पुणे जिल्ह्यांत ७, ८,९ तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, ७ तारखेला राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यात उन्हाचा कडाका पाहायला मिळणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. यामुळे उष्णतेच्या या लाटेमुळे काही भागात बळीराजाला उन्हाचा कडाका सहन करावा लागणार आहे तर काही जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच नुकसान होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-