Cranberry | आहारामध्ये क्रानबेरीचा समावेश केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Cranberry | टीम महाराष्ट्र देशा: निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करतात. यामध्ये बहुतांश लोक फळांचे सेवन करतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात क्रानबेरीचा समावेश करू शकतात. क्रानबेरीमध्ये भरपूर पोषक तत्व आढळून येतात. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर इत्यादी पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात यांचा समावेश करू शकतात. क्रानबेरीचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

युरीन इन्फेक्शन दूर होते (Urine infection is cured-Cranberry Benefits)

क्रानबेरीमध्ये आढळणारे गुणधर्म युरीन इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. क्रानबेरीमध्ये प्रोअँथोसायनिडिन नावाचे संयुग आढळून येते, जे युरिन इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही नियमित क्रानबेरी ज्युसचे सेवन करू शकतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Cranberry Benefits)

क्रानबेरीचे सेवन करणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आढळून येते, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्याचबरोबर क्रानबेरीचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. क्रानबेरीच्या मदतीने दृष्टी वाढण्यास मदत होते.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Cranberry Benefits)

हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात क्रानबेरीचा समावेश करू शकतात. क्रानबेरीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून सुटका मिळू शकते. यामध्ये आढळणारे होमोसिस्टीन नावाचे संयुग हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही क्रानबेरीच्या ज्यूसचे सेवन करू शकतात.

क्रानबेरीचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात त्याचबरोबर पाठीदुखापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

अश्वगंधा (Ashwagandha-For Back Pain)

अश्वगंधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे अनेक समस्यांवर मात करण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. पाठदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला अश्वगंधाचे मूळ पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर या पाण्याचे तुम्हाला दिवसातून दोनदा सेवन करावे लागेल. नियमित याचे सेवन केल्याने तुमची पाठदुखीची समस्या दूर होऊ शकते.

एरंडेल तेल (Castor oil-For Back Pain)

पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरू शकते. एरंडेल तेलाच्या मदतीने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंच्या ताण कमी होते. पाठदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला पाठीला साधारण 10 मिनिटे एरंडेल तेलाने मसाज करावी लागेल. नियमित असे केल्याने हळूहळू पाठ दुखीची समस्या कमी होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.