Deepak Kesarkar | एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री; केसरकरांचा टोला

Deepak Kesarkar | कोल्हापूर : राज्यात ठाकरे विरोध शिंदे जोरदार टीका टिपणी सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray ) यांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे स्वतःच म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदासाठी मला शरद पवारांनी जबरदस्ती केली. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले, याचे त्यांना वाईट वाटत नसेल, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी टीका केली. कोल्हापूरात ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

तसेच केसरकर यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर देखील हल्ला चढवला. आम्ही लोकांची कामे करत असल्याने आम्हाला मार्केटिंगची गरज नाही. मी कोल्हापूरचा पालकमंत्री असल्याने या परिसराचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मार्केटिंगची गरज आदित्य ठाकरे यांना आहे. त्यांनी अडीच वर्ष मंत्री राहून काही केलं नाही. मुंबईतील सर्वाधिक प्रदुषित झालेली हवा ही आदित्य यांची देणगी आहे. लोकांची बदनामी कशी करायची याच उत्कृष्ठ ट्रेनिंग आदित्य यांना दिलेलं आहे. ते ट्रेनिंग त्यांना लखलाभ होऊ दे अशा शब्दात आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी सांगितले की, अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. अयोध्या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार असल्याचेही देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना म्हणाले की, रामाचा आशीर्वाद लाखमोलाचा असतो. महाराष्ट्रात रामराज्य घडवण्यासाठी श्रीरामाचे आशीर्वाद लागणारच. म्हणून प्रभुरामाच्या आशीर्वादासाठी आम्ही जात आहोत.

महत्वाच्या बातम्या –

A

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.