Share

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! पर्यटन संचालनालयामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पर्यटन संचालनालय यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Govt Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

पर्यटन संचालनालय, नरीमन भवन, 156/ 157, पंधरावा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई- 21

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1RATFG5PNLyV1qyQvcoYIa7mh4n2aN9mB/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.maharashtratourism.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही