Share

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यांत येलो अलर्ट, विजांसह पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाल्याचं दिसून आलं  आहे. कुठे उन्हाच्या झळा (Heat Wave) वाढत चालल्या आहे. तर, कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाल्याचं दिसून आलं  आहे. कुठे उन्हाच्या झळा (Heat Wave) वाढत चालल्या आहे. तर, कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात ‘या’ जिल्ह्यांत येलो अलर्ट (Yellow alert in ‘these’ districts in the state)

राज्यामध्ये आज (8 एप्रिल) अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यामध्ये आज बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Weather Update) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यांमध्ये उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही