Share

IRCTC Recruitment | IRCTC मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

IRCTC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

IRCTC यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (IRCTC Recruitment) हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदाच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेतील (IRCTC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (IRCTC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 आणि 12 एप्रिल रोजी मुलाखतीकरीता उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400028

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.irctc.com/

महत्वाच्या बातम्या

IRCTC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया …

पुढे वाचा

Job Education

Join WhatsApp

Join Now