Ajit pawar | विरोधीपक्ष नेते अजित पवार नॉट रिचेबल; पाहा काय आहे प्रकरण

Political news | पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर महाराष्ट्र सत्तांतर झालं. इतिहासतील सर्वात मोठा बंड म्हणून याकडे बघितलं जातं. तर काल राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, त्यांच्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

दरम्यान अजित पवार सहपत्निक थेट पुण्यात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे येथील खराडी भागातील एका ज्वेलर्सच्या उद्गाटनासाठी अजित पवार आणि त्यांच्यी पत्नी सुनेत्रा पवार दाखल झाल्या होत्या. यावेळी दोघांनी मिळून दागिन्यांची पाहणीदेखील केली आहे.

तसंच अजित पवार आणि ७ आमदार नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंड करुन गुहाटीला गेले. अशाच प्रकारचं बंड तर नव्हे ना, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. तर मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार काल दुपारी २ पर्यंत बारामतीला होते. त्यानंतर दोन कार्यक्रमासाठी ते कोरेगाव पार्कमध्ये पोहचले. परंतु त्यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले. अचानक त्यांना मुंबईमधून फोन आला. तसंच दुसर कारण म्हणजे, त्यांची तब्येत बिघडल्यामुळं पुढचे कार्यक्रम रद्द केले असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितलं आहे. याचा अर्थ अजित पवार हे काल पुण्यातच होते.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button