Share

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी काकडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

🕒 1 min readWeight Loss | टीम महाराष्ट्र देशा: काकडी (Cucumber) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीरासोबत त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. काकडीमध्ये प्रोटीन, विटामिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनीज, व्हिटॅमिन के इत्यादी पोषक घटक आढळून येतात. काकडीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्यासाठी काकडी उपयुक्त … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: काकडी (Cucumber) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीरासोबत त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. काकडीमध्ये प्रोटीन, विटामिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनीज, व्हिटॅमिन के इत्यादी पोषक घटक आढळून येतात. काकडीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्यासाठी काकडी उपयुक्त ठरू शकते. काकडीचे नियमित सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने काकडीचे सेवन करू शकतात.

काकडीचा रस (Cucumber juice For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडीच्या रसाचा समावेश करू शकतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. रिकाम्या पोटी काकडीच्या रसाचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

काकडीची कोशिंबीर (Cucumber salad For Weight Loss)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीच्या कोशिंबिरीचा समावेश करू शकतात. यासाठी तुम्हाला काकडीचे तुकडे करून त्यामध्ये लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळून घ्यावे लागेल. नियमित काकडीच्या कोशिंबिरीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

काकडी स्मुदी (Cucumber Smoothie For Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीच्या स्मृदीचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला काकडी बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जवसाच्या बिया मिसळून घ्यावे लागतील. नियमित या मिश्रणाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर काकडीची स्मृदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये गोड लस्सीचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था मजबूत राहते (Digestive system remains strong-Sweet Lassi Benefits)

उन्हाळ्यामध्ये गोड लस्सीचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळून येतात, जे पचनक्रिया मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर या लस्सीमध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे पोटातील बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये गोड लस्सीचे सेवन दिवसा करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

तणाव दूर होतो (Relieves stress-Sweet Lassi Benefits)

उन्हाळ्यामध्ये गोड लस्सी प्यायल्याने मन थंड राहते आणि तणावही दूर होतो. त्याचबरोबर या गरम वातावरणात गोड लस्सीचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यामध्ये गोड लस्सीचे सेवन केल्याने शरीरातील अनेक आजार सहज दूर होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या