Stretch Marks | कमरेवरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी करा ‘या’ तेलांचा वापर

Stretch Marks | टीम महाराष्ट्र देशा: वजन वाढल्यामुळे शरीरात ताण निर्माण होतो आणि स्ट्रेच मार्क निर्माण व्हायला लागतात. त्याचबरोबर महिलांना गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्सला समोर जावे लागते. हे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे हे स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी तुम्ही काही तेलांचा वापर करू शकतात. या तेलांचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचे हानी होत नाही आणि स्ट्रेच मार्क देखील सहज दूर होतात. कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी तुम्ही खालील तेलांचा वापर करू शकतात.

ऑलिव्ह ऑइल (Olive oil-For Stretch Marks)

कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइलने स्ट्रेच मार्क्सवर साधारण पंधरा ते वीस मिनिटे मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करावी लागेल. दिवसातून दोन वेळा या तेलाने मसाज केल्यास स्ट्रेच मार्क दूर होऊ शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-For Stretch Marks)

कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेलाने त्याच्यावर मसाज करावी लागेल. नियमित स्ट्रेच मार्कवर खोबरेल तेल लावल्याने तुमचे स्ट्रेसमार्क हळू-हळू दूर व्हायला लागतील.

एरंडेल तेल (Castor oil-For Stretch Marks)

कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एरंडेल तेलामध्ये बदाम तेल किंवा खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने स्ट्रेच मार्क्सवर मसाज करावी लागेल. साधारण दोन ते तीन महिने या तेलाने मसाज केल्याने स्ट्रेच मार्क दूर होऊ शकतात.

कमरेवरील स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी तुम्ही वरील तेलांचा वापर करू शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही खालील औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात.

कडूलिंब (Neem -Ayurvedic Herbs for Skin Care)

कडूलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटीस्पेक्टिक, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास डागांवर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून एक ते दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.

जेष्ठमध (Jesthamadh -Ayurvedic Herbs for Skin Care)

आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी जेष्ठमध उपयुक्त ठरते. त्याचबरोबर त्वचेवरील अनेक समस्या दूर करण्यासाठी जेष्ठमध फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला ज्येष्ठमध पावडरची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास डागांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.