Urban Bank | अर्बन बँकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Urban Bank | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अर्बन को-ऑपरेटिव बँक सांगली आणि कोल्हापूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Urban Bank) विविध पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये ऑफिसर पदाच्या 2 जागा, सॉफ्टवेअर डेव्हलपर पदाची 1 जागा आणि ब्रांच मॅनेजर पदाची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Urban Bank) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार बँकेच्या  अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Urban Bank) इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत ईमेल द्वारे अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवारांना पुढील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

required2k23@gmail.com

अधिकृत वेबसाइट (सांगली)

https://www.sangliurbanbank.in/

अधिकृत वेबसाइट (कोल्हापूर)

https://kopurbanbank.com/

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.