Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत आयोध्या दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Devendra Fadnavis | मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अचानक ठरलं! असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येला भाजप मंत्र्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.

तसंच फडणवीस यांच्यासोबत भाजपचे सर्वच मंत्री असणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला फक्त शिवसेनेचा अयोध्येचा दौरा असल्याचं सांगितलं जात होतं. भाजपचे नेते या दौऱ्यात सामील होणार असल्याचं शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यांनी सांगितलं नव्हतं. तर फक्त मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार, खासदार दौरा करणार असल्याची माहिती समोर आली होती. ते अयोध्येत रामाचं दर्शन घेणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली. जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत. या दौऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत.

मात्र, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला गेले. त्यांच्यासोबत भाजपचे दोन- तीन नेते फक्त होते. परंतु, एकनाथ शिंदे हे लखनऊ विमानतळावर आल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस हे भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला जात असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

दरम्यान, लखनऊमध्ये या दौऱ्याची वातावरण निर्मिती करण्यात शिंदे यशस्वी झाल्यामुळे भाजपनेही या दौऱ्यात सहभागी होत असल्याचं बोललं जात आहे. काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून अयोध्येकडे जाण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. अचानक फडणवीस यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या दौऱ्यामागे भाजप आणि शिंदेंची कोणती राजकीय खेळी असणार का हे पाहणं रंजक ठरेल तर या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button