Strong Memory | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ गोष्टींचे सेवन

Strong Memory | टीम महाराष्ट्र देशा: मेंदूची काळजी (Brain Care) घेणे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहाराचे सेवन केले पाहिजे. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अँटिऑक्सिडंट, हेल्दी फॅक्ट्स, विटामिन्स आणि मिनरल्सने समृद्ध असलेल्या पोषक पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे असते. या  पदार्थांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढू शकते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी खालील पदार्थांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू निरोगी राहतो.

सुका मेवा (Dry fruits-For Strong Memory)

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सुक्या मेव्याचे सेवन करू शकतात. सुक्या मेव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे मेंदूची काळजी घेण्यास आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बदाम, अक्रोड, मनुके इत्यादींचे सेवन करू शकतात.

ॲवोकॅडो (Avocado-For Strong Memory)

ॲवोकॅडोमध्ये भरपूर पोषक तत्व आढळून येतात, जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ॲवोकॅडो सेवन केल्याने मेंदू निरोगी राहतो आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. ॲवोकॅडोचे सकाळी रिकाम्या पोटी नियमित सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात.

अंडी (Egg-For Strong Memory)

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर अंड्यामध्ये विटामिन बी6, फॉलीक ॲसिड, विटामिन बी12 इत्यादी भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे सर्व पोषक घटक मेंदूची काळजी घेण्यास मदत करतात. त्यामुळे मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंड्याचे सेवन करू शकतात. अंड्याचे नियमित सेवन केल्याने हाडे देखील मजबूत होतात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

काकडीचा रस (Cucumber juice For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडीच्या रसाचा समावेश करू शकतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. रिकाम्या पोटी काकडीच्या रसाचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

काकडीची कोशिंबीर (Cucumber salad For Weight Loss)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीच्या कोशिंबिरीचा समावेश करू शकतात. यासाठी तुम्हाला काकडीचे तुकडे करून त्यामध्ये लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळून घ्यावे लागेल. नियमित काकडीच्या कोशिंबिरीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या